पंजाबराव डख यांच्याबद्दल काही वेगळी माहिती नक्की वाचा.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख सर आणि त्यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज गावा गावात चर्चा होताना दिसून येते. त्यांचे अंदाज सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणा वर व्हायरल होताना दिसून येतात.
जालना, औरंगाबाद आणि परभणी या जिल्ह्यां मध्ये रिपोर्टिंग करत असताना मी स्वत: याचा अनुभव घेतला.
28 मे रोजी मी औरंगाबाद मधल्या शेंद्रा कमंगर या गावी होतो. पाऊस-पाण्या वर चर्चा सुरू असताना तिथल्या शेतकऱ्यांनी, मला सांगितलं, “पंजाबराव डख सर यांचे अंदाज आमच्यापर्यंत येत असतात. आम्ही त्यांच्या अंदाजाची वाट पाहत असतो.”


असाच अनुभव मला गेल्या वर्षी जालन्यात आला. जालना जिल्ह्या तील अंबड तालुक्यात चंदन शेतीची बातमी करण्या साठी गेलो असता तिथले ही शेतकरी म्हणाले, “पंजाब राव डख सर यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.”

पंजाबराव डख सर यांची त्यांच्या हवामाना च्या अंदाजा मुळे एवढी क्रेझ निर्माण झालीय, की महाराष्ट्रात ल्या गावा गावांमध्ये त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. तसेच मिरवणूका काढल्या जात आहेत.
त्यामुळे मग पंजाबराव डख सर कोण आहेत? ते हवामानाचा अंदाज कशा प्रकारे सांगतात? तसेच तो अंदाज कितपत खरा ठरतो? त्यांच्या अंदाजां वर हवामान तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? व पंजाबराव डख सर यांचा अंदाज शेतकऱ्यांना किती पटतो? ते आता आपण जाणून घेणार आहोत. या लेखामधील आकडेवारी ही २०२१ मधील आहे परंतु या लेखाचा उद्देश पंजाबराव डख यांच्याविषयी माहिती देणे हा आहे.

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबराव डख सर कोण आहेत?


पंजाबराव डख सर यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या परभणी जिल्ह्यातल्या गुगळी धामनगाव (26 ऑगस्ट 2021) या गावात पोहोचलो.
दुपारी कुठेतरी मार्गदर्शन करण्या साठी जायचं असल्यामुळे त्यांनी आम्हाला सकाळीच 8 वाजता बोलावलं होतं.
तुमच्या विषयीची वैयक्तिक माहिती सांगा असं विचारल्यार ते म्हणाले, “माझं बीए झालेलं आहे. सीटीसीए आहे आणि एटीडी आहे. मी गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून 2012 साली लागलो होतो. पण, 2017 च्या नंतर त्याला कोर्टानं स्टे दिला. त्यामुळे सगळे 18 हजार शिक्षक आता रिक्त पदावर आहेत.”
शेती विषयी विचारल्या वर ते म्हणाले, “माझ्याकडे 10 एकर जमीन आहे. 1995 पासून माझा हवामाना वर अभ्यास आहे. त्यामुळे मी निर्सगा वर, हवामाना वर आधा-रित शेती करतो. मी सोयाबीन आणि हरभरा पिके घेतो. घरचंच बियाणं वापरतो. बिगर बैला ची, बिगर गड्याची, बिगर मजुरा ची शेती करतो.”

हवामाना बद्दल नेमकं काय शिक्षण घेतलंय, या प्रश्नाचं उत्तर देताना डख सर म्हणाले, “मी आणि माझे वडील हिंदी मधील हवामाना च्या बातम्या पाहायचो. त्यात हवामाना चे अंदाज दाखवाय चे. हिंदी आणि इंग्रजी त अंदाज सांगितला जायचा, पण तो राष्ट्रीय पातळी वर सांगितला जायचा. मग मी वडिलां ना म्हणालो की महाराष्ट्रात 42 हजारां हून अधिक गावं आहेत. त्यामुळे मग राज्यात नेमका पाऊस कुठे आणि कधी पडेल हे कसं सांगायचं? त्या वेळेस मी आठवीला होतो.
“तेव्हा पासूनच मला हवामाना चा छंद लागला. 2002 ला परभणी ला जाऊन सीडॅक कॉम्प्युटर चा कोर्स केला. तिथं फक्त आणि फक्त उपग्रह बघण्यासाठी मी जात होतो. त्यानंतर निसर्गा च्या बारीक बारीक बदलांवर अभ्यास सुरू केला.”
पावसाचा अंदाज कसा सांगता हा प्रश्न असं विचारल्या वर ते म्हणाले, “माझा उपग्रह आणि निसर्गा वर अभ्यास आहे. माझं निरीक्षण खूप आहे. मी शेतकऱ्यां च्या भल्या साठी काम करतो म्हणून मला केवळ पाण्याचे ढग दिसतात. माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी जे बघतो ते शेतकऱ्यां च्या भल्याच्या दृष्टिकोना तून बघतो.”

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाबराव डख सर यांनी त्यांच्या नैसर्गिक निरीक्षणां ची नोंद वह्यां मध्ये करून ठेवली आहे.
पण, पावसाचा अंदाज सांगण्याचं तुमचं तंत्र काय आहे, असं विचारल्या वर डख सर म्हणाले, “माझा शास्त्रीय, नैसर्गिक आणि वातावरणा चा अभ्यास आहे. निसर्गात पाऊस येणार की नाही हे सांगणारे काही इंडिकेटर्स असतात. ते पाहून पाऊस येणार की नाही ते कळतं.”
23 ते 28 ऑगस्ट 2021 दरम्यान पाऊस पडणार नाही, सूर्यदर्शन होईल, असा अंदाज तुम्ही सांगितला होता. पण, या काळात आम्ही रिपोर्टिंग करत आम्हाला जालन्यात 25 ऑगस्ट रोजी पाऊस लागला. त्यात आम्ही भिजलोसुद्धा. याच दिवशी बीड आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडल्याच्या बातम्या होत्या. मग तुमचा अंदाज चुकतो, असं नाही का वाटतं, असं विचारल्यावर डख सर म्हणाले,
“नाही, माझा अंदाज चुकीचा ठरत नाही. तुम्ही माझा मेसेज नीट बघितला की कळेल, त्यात राज्यात काही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल असं लिहिलं आहे. मी पाऊस जरी नाही सांगितला तरी स्थानिक वातावरणा हून त्याजागी पाऊस पडतो, हे शेतकऱ्यांना माहिती असावं. वारे बदल झाला की, पावसाची दिशा, ठिकाण आणि वेळ बदलते.”

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


जूनच्या सुरुवातीचा अंदाज काय?


“राज्यात जून 1, 2, 3, 4 दरम्यान दररोज भाग बदलत पावसा चं जोरदार आगमन होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सागंली, पुणे, नगर, नाशिक, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद-वैजापूर असा भाग बदलत पाऊस पड-णार आहे. शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, बदलते हे माहीत असावं,” पंजाबराव डख सर यांनी अली कडे जारी केले ला अंदाज असा होता.
या अंदाजा विषयी विचारल्या वर औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मधील तरुण शेतकरी संदीप औताडे सांगतात, “1 जून रोजी वैजापूरला एकदम तुरळक पाऊस झाला. 2 तारखेला मात्र वैजापूरच नाही तर माझ्या लासूर स्टेशन गावात सुद्धा पाऊस पडलेला नाही.”

पंजाबराव डख सर माहिती आहेत का, असं विचारल्यावर औताडे म्हणाले, “पंजाबराव डख सर यांचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. गेल्या वर्षी त्यांचे अंदाज बरोबर आले होते. या वर्षीचे अंदाज फसले आहेत. ते नेमकं कशाच्या आधारे अंदाज देत आहेत, हे सांगत नाहीत.”
“पंजाबराव डख सर आता बियाण्यां च्या कंपन्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही जात आहेत. त्या मुळे शेतकरी वर्गात चुकीचे मेसेज चालले आहेत,” असंही औताडे म्हणाले.

हवामान तज्ज्ञ काय म्हणतात?


पंजाबराव डख सर यांच्या हवामाना च्या अंदाजा विषयी काय वाटतं, हे हवामान तज्ञां कडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांच्या मते, “आपल्या देशात एकूण 36 हवामान विभाग आहेत. महाराष्ट्रात 4 हवामान विभाग आहेत. हवामान विभागा ची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. हवामान विभाग हा विभाग निहाय अंदाज देत असतो. हवामान अंदाजा चा हा एक विश्वासार्ह स्रोत आहे. भारतीय हवामान विभागा च्या अंदाजा ची अचूकता 85 ते 90% आहे. त्यामुळे इतरांच्या भोंदूपणावर विश्वास ठेवू नये.”
“हवामान विभाग दर 15 दिवसांचा अंदाज देत असतं आणि दररोज यासंदर्भातले नकाशे प्रकाशित करत असतं. यात OLR मॅप जो मान्सून च्या हालचाली दर्शवत असतो तसंच INSAT CCD (सॅटेलाईट मॅप) असतो. शेतकऱ्यां च्या मुलांनी हवामान विभागाचे हे अंदाज वाचायला शिकलं पाहिजे. याशिवाय जवळच्या हवामान केंद्रावरचा हवेचा दाब पाहिला पाहिजे,” असं ते पुढे म्हणाले.

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


तर एका ज्येष्ठ हवामान तज्ञा नं नाव न छापण्या च्या अटीवर म्हटलं, “हवामानाचा अंदाज सांगणं हे फार हुशार लोकां चं काम आहे. पण, हवामाना चं बेसिक ज्ञान नसताना हवामाना चे अंदाज कुणी सांगत असेल तर अवघड आहे. वारे, ढग, तापमान, आद्रर्ते बद्दलचे ज्ञान नसेल, कधी वेधशाळेत गेला नसेल आणि हवामाना चा अंदाज सांगत असेल तर हे खूप रिस्की काम आहे.”
दरम्यान, 8 जून ते 15 जून दरम्यान राज्यात जोरदार पावसाची हजेरी असणार, असा अंदाज पंजाबराव डख सर यांनी 4 जून रोजी व्यक्त केला आहे.

तर, भारतीय हवामान विभागा चे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी 5 जून रोजी एक ट्वीट करत म्हटलंय की, “राज्या तील अनेक स्वयंघोषित तज्ज्ञांनी पावसा बद्दल केलेल्या चुकीच्या निवेदनां वर विश्वास ठेवू नका. पेरणी साठी शेतकऱ्यां नी राज्याच्या कृषी विभागा कडून मिळणाऱ्या सल्ल्यां कडेच लक्ष द्यावं. भारतीय हवामान विभागानं सतत दिलेल्या पावसाबद्दल माहिती पाहावी.”

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया


शरद सवडे मराठवाड्यात ल्या जालना जिल्ह्या तील शेतकरी आहेत.
पंजाबराव डख सर यांच्या हवामानाच्या अंदाजा विषयी विचारल्या वर ते सांगतात, “पंजाबराव डख सर यांचे अंदाज व्हॉट्सअप वर आमच्या पर्यंत पोहोचत असतात. त्यांनी सांगितलेलं अॅक्युरेट ठरतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. आम्ही स्वत: त्यांच्या अंदाजा वर विश्वास ठेवतो आणि त्याचा आम्हाला फायदा ही होतो.

तर विदर्भात ल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सुभाष खेत्रे सांगतात, “पंजाबराव डख सर यांचे हवामाना चे अंदाज व्हॉट्सअप वरून आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यांचे अंदाज 70 ते 80 % खरे ठरतात. थोडं फार मागे-पुढे होतं. पण, आमचं आधी जे नुकसान व्हायचं ते त्यांच्या अंदाजा मुळे झालं नाही. त्यांच्या अंदाजा नुसार आम्ही काम करत असतो.”
दरम्यान, हवामान विभागा च्या वेबसाईट वर जाऊन अंदाज कसे बघायचे, हे शेतकऱ्यां ना माहिती नसतं. पंजाबराव डख सर आणि इतर काही जणांचे हवामाना चे अंदाज थेट व्हॉट्सअपवरून आणि सोप्या भाषेत आमच्या पर्यंत येतात. त्यामुळे मग त्यांची शेतकऱ्यांमध्ये क्रेझ आहे, असं संदीप औताडे सांगतात.

हवामानाचा अंदाज कुठे आणि कसा बघायचा?


भारतीय हवामान विभागाचा अंदाज हा हवामाना च्या अंदाजाचा अधिकृत स्रोत समजला जातो. या शिवाय कृषी विद्यापीठां च्या परिसरात हवामान केंद्रे स्थापन केलेली असतात. तिथेही हवामानाचे अंदाज व्यक्त केले जातात.
स्कायमेट ही हवामानाचा अंदाज देणारी खासगी संस्था आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेट यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
भारतीय हवामान विभागा चा अंदाज बघण्या साठी सगळ्यात आधी तुम्हाला विभागा च्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल.
या वेबसाईट वर दिसत असलेल्या Warnings या भागात विशेष काही इशारा असेल, तर त्याची तारीख आणि जिल्हा निहाय तसंच विभाग निहाय माहिती दिलेली असते. जसं इथं 6 जून रोजी वाशिमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवली आहे.

Sharing Is Caring:

1 thought on “पंजाबराव डख यांच्याबद्दल काही वेगळी माहिती नक्की वाचा.”

  1. मी गेल्या ३ वर्षापासून तयांचे हवामान अंदाज माझे वैयक्तिक what’s up वर येतात. त्यांनी सांगितले ले अंदाज बरोबर असतात असा माझा अनुभव आहे. मला आलेले अंदाज ईतर शेतकरी वर्गास फॉरवर्ड करतो. शेतकरी वर्गात ते खूपच लोकप्रिय झाले आहेत.

    Reply

Leave a Comment