Gold rates information in marathi: दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात अनेक लोक सोने खरेदीला आपली पहिली पसंती दर्शवतात. त्याच बरोबर या वर्षी मंदीसदृश परिस्थिती असल्याचं सांगितल जात असतानाही, सोन्याचे भाव हे चाळीस हजारांवर जाऊन पोहचले आहेत. Gold rates
विशेषत: तीन महिन्यांआधी सोन्याचा भाव हा प्रती 10 ग्रॅमसाठी तब्बल 40 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या वर्षी सोन्याच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या पाच दिवसांत याच सोन्याच्या दरात अनेक चढउतार दिसून आले आहेत. मुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 39,250 रुपयांवरून 39,725 रुपयांवर पोहोचला होता.
सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जसं की अमेरिका-चीन ट्रेड वॉर आणि ब्रेक्झिटचे सावट यामुळे देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे.
याशिवाय, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनासह येणाऱ्या सणांच्या दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीत वाढ होण्याबाबत आशा दिसत असल्याचं ज्वेलर्स सांगत आहेत. Gold rates
या सगळ्याचा प्रतिसाद म्हणून, किरकोळ विक्रेते आणि ज्वेलर्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची सोने खरेदी वाढवण्यासाठी विविध आकर्षक ऑफर आणि जाहिराती ग्राहकांसमोर आणलेल्या आहेत.
सोने महागले, सोनं खरेदी करायचं की विकायचं? | Gold rates information in marathi
सोन्याच्या किमतीत अलीकडेच झालेल्या वाढीमुळे सोने विकत घ्यायचे की विकायचे हा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. सोन्याच्या किमतीत गेल्या वर्षभरात चांगलीच म्हणजे 20 टक्के वाढ झाली असून, 26 ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत ही प्रती 10 ग्रॅमसाठी 40,220 रु. एवढी होती तर त्याच्या बरोबर एक वर्षाआधी म्हणजेच 26 ऑगस्ट 2018 रोजी या सोन्याची किंमत ही प्रती 10 ग्रॅम 30,230 रू. इतकी होती.
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीत देखील काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मागील महिन्यात प्रती डॉलर 72.60 रुपयांची घसरण झाल्याच्या नंतर रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत 71 रुपयांपर्यंत आली आहे.
शिवाय, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या वर्षी सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात ही सप्टेंबर 2018 च्या तुलनेत 68 टक्क्यांनी कमी झाली होती. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरणे या दोन्ही कारणांमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. सोने महाग झाल्याने साहजिकच त्याचा बाजारातील खरेदीवर देखील परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.
सोने महाग का झाले? | Why gold became expensive? | Gold rates
सोन्याच्या किंमतीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा प्रभाव पडतो.
कर | tax
त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कर. अलीकडच्या बजेट मधे मोदी सरकारने सोन्यावरील कराची किंमत 10% वरून 12.5% पर्यंत वाढवून कर वाढवला. Gold rates information in marathi
याव्यतिरिक्त, सोनार सोन्याच्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस म्हणजेच घडणावळ आकारतात, जे डिझाइनच्या आधारावर 4% ते 20% पर्यंत असू शकतात.
शिवाय, सोन्याचे दागिने खरेदी करताना, 3% वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला जातो. हा जीएसटी सोन्याचे एकत्रित मूल्य आणि मेकिंग चार्जेसच्या आधारे आकारला जातो.
या घटकांचा परिणाम म्हणून, सोन्याच्या एकूण किमतीत वाढ झाली आहे, प्रामुख्याने घडणावळ आणि जीएसटी लागू झाल्यामुळे, ग्राहकांसाठी सोने अधिक महाग झाले आहे.
डॉलर-रुपया आणि सोने | Dollar-Rupee and Gold
डॉलरसोबतच्या तुलनेमध्ये सोन्याचे दर आणि रुपयाची किंमत यांचंही नात जवळच आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले जात असल्याने, जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो, तेव्हा आयात होणाऱ्या सोन्याची किंमत वाढते आणि परिणामी त्यासाठी जास्तीचा खर्च करावा लागतो. 23 ऑगस्ट रोजी ज्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपया 72 रुपयांच्या पातळीवर गेला तेव्हा ही परिस्थिती स्पष्ट झाली होती.
व्याजदर आणि सोने | Interest rates and gold
बँकांमधील व्याजदर आणि सोन्याचे दर एकमेकांशी संबंधित आहेत. जेव्हा बँकेचे व्याजदर जास्त असतात, तेव्हा लोक बँकेत गुंतवणूक करण्याला अधिक पसंती देतात कारण सोन्याच्या गुंतवणुकीवर कोणतेही व्याज मिळत नाही. शिवाय बँकेचे व्याजदर कमी झाल्यास किंवा गुंतवणुकीच्या इतर मार्गांवरून मिळणारा परतावा कमी झाल्यास किंवा मग गुंतवणूकीतील सुरक्षितता कमी झाली की, लोक सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. परिणामी मागणीत वाढ होते आणि मागणीतील या वाढीमुळे सोन्याच्या किमतीत देखील वाढ होते.
आंतरराष्ट्रीय घडामोडी | International Affairs
जागतिक अर्थव्यवस्था (The world economy) सध्या मंदीच्या दिशेने जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. प्रामुख्याने युनायटेड स्टेट्स आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा धोका निर्माण झाला आहे. हा ट्रेड वॉर केवळ या दोन राष्ट्रांपुरता मर्यादित नसून इतर देशांवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. दुर्दैवाने, या ट्रेड वॉर वर तात्काळ तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नसल्याने, अनेक देश हे आपले Gold Reserves म्हणजेच सोन्यातील गुंतवणूक वाढवत आहेत आणि म्हणूनच सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे, आणि सोने हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय बनला आहे.
World Gold Council ने दिलेल्या अहवालानुसार, 2019 च्या पहिल्या सहा महिन्यांत 374.1 टन सोन्याची खरेदी करून विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचा सोन्याचा साठा वाढवला आहे. विविध देशांच्या मध्यवर्ती बँका ह्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत.
शिवाय, यूके, जर्मनी, रशिया, सिंगापूर आणि ब्राझीलसह जगभरातील नऊ प्रमुख अर्थव्यवस्था मंदीच्या काठावर आहेत, परिणामी, जगभरातील शेअर बाजारात घसरण होऊन गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. Gold rates information in marathi
देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती | country’s economy
संभाव्य मंदीकडे वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होत आहे.
CRISIL ने आपल्या विकास दराचे उद्दिष्ट कमी करून 6.9% पर्यंत खाली आणलआहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) ने सांगितल आहे की भारतीय अर्थव्यवस्थेचा वृध्दी दर (growth rate) हा 2019 मध्ये 7% आणि 2020 मध्ये 7.2 टक्क्याने वाढेल. या आर्थिक परिस्थितीमुळे भारतातील सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत.
खरेदीवर परिणाम | Effect on purchase
सोन्याच्या किमतीतील लक्षणीय वाढीचा थेट परिणाम खरेदीच्या ट्रेंडवर झाला आहे. Indian Bullion and Jewelers Association चे सचिव सुरेंद्र मेहता यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात मागणीत मोठी घसरण झाली असल्याने, खरेदीत अंदाजे 60% घट झाली आहे. याउलट, या वाढलेल्या दरांचा फायदा करून घेण्यासाठी आपल्या जवळ असणारे सोने विकणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नेहमीपेक्षा 70 ते 80% लोक त्यांचे सोने विकण्यास आमच्याकडे येत आहेत.
दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ४२,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता सुरेंद्र मेहता यांनी व्यक्त केली आहे.
तथापि, सणासुदीच्या आणि लग्नाच्या खरेदीच्या बाबतीत, मेहता म्हणतात की भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये सामान्यत: सोने खरेदीचा समावेश असतो, आणि या वेळी सोन्याच्या खरेदीत 10% पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. सणांसाठी सोन्याच्या खरेदीवर सर्वाधिक परिणाम जाणवेल, कारण सणाच्या काळातील सोन्याची खरेदी ही गरजेपेक्षा हौस म्हणून केली जाते आणि या वेळी या खरेदीत 30 ते 35% घट होऊ शकते.
सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे? | What should ordinary investors do?
अर्चना भिंगार्डे, ज्या एक फायनान्शियल प्लानर आहे, त्या म्हणतात की गुंतवणूकदारांनी त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओच्या, सुमारे 5 ते 10% सोन्यामध्ये गुंतवणूक करावी. कोणत्याही एका विशिष्ट गुंतवणूक पर्यायात मोठी गुंतवणुक करू नये. म्हणजेच जर कोणत्या क्षेत्रात अस्थिरता येऊन दर कमी जास्त झालेच तर त्याचा आपल्याला फटका बसत नाही.
सोन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करताना, सोने खरेदी करण्यापेक्षा बुलियनला प्राधान्य दिले पाहिजे असं त्या पुढे सांगतात. कारण बुलियन गुंतवणुकीत भावनिक जोड नसल्यामुळे गरजेनुसार त्याची विक्री करणे सोपे होते.
शिवाय, सोन्याच्या गुंतवणुकीसाठी Gold exchange-traded funds हा देखील एक उत्तम पर्याय आहे. Gold ETF हा प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याच्या तुलनेत एक सुरक्षित पर्याय आहे कारण त्यात प्रत्यक्षात सोन्याची हाताळणी करावी लागत नाही. यामधे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी आणि सोन्याच्या बाजारातील वारंवार होणाऱ्या किमतीतील चढउतारांमुळे घाबरून जाऊ नये असेही त्या पुढे म्हणाल्या. Gold rates