Free Invitation Cards Making in Marathi: आता कार्यक्रमासाठी मराठी डिजिटल निमंत्रणपत्रिका कुणीही तयार करू शकतं… तेही अगदी मोफत! फक्त करा एवढंच…

Free Invitation Cards Making in Marathi: आपण भारतीय असल्यामुळे आपले अनेक सण, उत्सव आणि समारंभ हे आपल्यासाठी केवळ एक औपचारिकता नसून, नात्यांचा, प्रेमाचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग असतो. लग्नसोहळा असो, नामकरण विधी, वाढदिवस वा गृहप्रवेश, हे केवळ कार्यक्रम नसतात, तर एकत्र येण्याची, आनंद साजरा करण्याची आणि आपल्या माणसांना जवळ करण्याची संधी असते. आणि या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे, निमंत्रणपत्रिका.

पूर्वी कागदावर छापलेली पत्रिका हातात देणे ही परंपरा होती. पण आजच्या काळात, जेव्हा वेळ आणि खर्च दोन्ही फार महत्त्वाचे झाले आहेत, तेव्हा डिजिटल निमंत्रणपत्रिका म्हणजे एक सोयीचा आणि किफायतशीर पर्याय ठरत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः जर ती मोफत बनवता येत असेल, तर यापेक्षा जास्त काय हवं?

चला तर पाहूया, कोणत्या खास वेबसाइट्स आणि ऍप्सच्या मदतीने आपण सहजपणे, अगदी मोफत मराठी निमंत्रणपत्रिका तयार करू शकतो.

कोणकोणत्या कार्यक्रमांसाठी निमंत्रणपत्रिका तयार करावी लागते?

आपल्या समाजात वर्षभर अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक समारंभ साजरे केले जातात. प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगळ्या निमंत्रणपत्रिका तयार करणे ही गरज असते. जसे की,

  • लग्नपत्रिका
  • साखरपुडा निमंत्रण
  • हळदी समारंभ
  • गृहप्रवेश / वास्तुशांती
  • नाव ठेवणे (नामकरण)
  • जावळ किंवा मुंज
  • सत्यनारायण पूजन
  • ओटीभरणी

का निवडावी डिजिटल निमंत्रणपत्रिका?

आजच्या युगात बहुतेक लोक WhatsApp, Telegram, Email अशा डिजिटल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यातूनच डिजिटल निमंत्रणपत्रिकेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. याचे फायदे देखील बरेच आहेत जसे की, वेळ आणि खर्च वाचतो, हा एक पर्यावरणपूरक पर्याय आहे, सोबतच ती अगदी सहज शेअर करता येते आणि यामध्ये डिझाईनसाठी विविध पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.

मोफत निमंत्रणपत्रिका तयार करण्यासाठी उपयुक्त वेबसाइट्स आणि ऍप्स

1. Canva (https://www.canva.com/)

Canva ही एक प्रसिद्ध डिजायनिंग वेबसाइट आहे. इथे तुम्ही मराठीतून किंवा इतर कोणत्याही भाषेत सहज आणि आकर्षक निमंत्रणपत्रिका तयार करू शकता. यात अनेक मोफत टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. तुमच्या कार्यक्रमानुसार योग्य फॉर्मॅट निवडा, त्यात पाहुण्यांची माहिती आणि कार्यक्रमाची माहिती भरा, आणि मग काही मिनिटातच तुमची खास निमंत्रणपत्रिका तयार होईल.

2. All in One Marathi Invitation Card Maker App

https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards

या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही मराठी पद्धतीची निमंत्रणपत्रिका अगदी सहज बनवू शकता. लग्न, मुंज, गृहप्रवेश, नामकरण, सत्यनारायण पूजा यांसारख्या विविध कार्यक्रमांसाठी खास मराठी डिझाईन टेम्प्लेट्स दिले आहेत. तुमचं नाव, कार्यक्रमाचा पत्ता, वेळ आणि तारीख भरली की, तुमची निमंत्रणपत्रिका तयार! कोणताही टेक्निकल नॉलेज न लागता, तुम्ही मोफत आणि सुंदर निमंत्रणपत्रिका बनवू शकता.

3. Greetings Island (https://www.greetingsisland.com/)

ही वेबसाइट इंग्रजीत आहे पण तरी ती वापरणं खूप सोपं आहे. लग्न, साखरपुडा, रिसेप्शन, वाढदिवस, अशा विविध कार्यक्रमांसाठी येथे आकर्षक टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. काही मोफत असतात, तर काही प्रीमियम डिझाईन्ससाठी शुल्क भरावं लागतं. तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य डिझाईन निवडून, हवी ती माहिती भरून तुम्ही तुमची डिजिटल निमंत्रणपत्रिका तयार करू शकता.

4. Paperless Post (https://www.paperlesspost.com/)

ही आणखी एक चांगली वेबसाइट आहे जिथे सुंदर, आकर्षक आणि क्लासी निमंत्रणपत्रिका तयार करता येतात. यामध्ये काही मोफत डिझाईन्स आहेत आणि काही प्रीमियम. वापरासाठी नोंदणी आवश्यक आहे, पण एकदा साईन अप केलं की तुमच्या गरजेनुसार निमंत्रणपत्रिका तयार करणं खूप सोपं होतं.

मोफत निमंत्रणपत्रिका बनवण्यासाठी आज इतके पर्याय उपलब्ध असताना, परत परत डिझायनरकडे जाऊन पैसे खर्च करण्याचं कारणच उरत नाही. या वेबसाइट्स आणि अ‍ॅप्समुळे तुमचा वेळही वाचतो, खर्चही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, निमंत्रण पाठवणं अधिक सुलभ होतं.

Sharing Is Caring:

Leave a Comment